मनसे-शिवसेना आज एकत्र येणार?, Raj Thackeray & manohar joshi at ravindra natyamandir

मनसे-शिवसेना आज एकत्र येणार?

मनसे-शिवसेना आज एकत्र येणार?
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख यांची इच्छा कालच रामदास कदम यांनी व्यक्त केली की, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं. गेल्या काही दिवसांपासून सेना आणि मनसेमधील जवळीक सगळ्यांनाच माहित आहे. आजही रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या एका सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हे दोघे एकाच मंचावर हजर राहणार आहेत.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दिल्या जाणाऱ्या शांताबाई शेळके साहित्य पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहतील.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन सुमारे दोन तास बाळासाहेबांसोबत घालवले होते. यापूर्वी मनोहर जोशी यांनीही राज आणि उद्धवनं एकत्र येणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मनसे शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चेला चांगलच उधाण आलं आहे.

First Published: Friday, October 12, 2012, 13:28


comments powered by Disqus