नवीन वर्षात फटाके फोडणार – राज ठाकरे , raj thackeray comment on his silance

नवीन वर्षात फटाके फोडणारः राज ठाकरे

नवीन वर्षात फटाके फोडणारः राज ठाकरे
www.24taas.com, मुंबई

शांता शेळके पुरस्कार सोहळ्यात केवळ चिमटे काढल्यानंतर अनेक दिवसांपासून राजकीय वक्तव्य न केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वर्षात फटाके फोडणार असल्याच सांगितले. ‘मी मुंबईतच असून कोठेही गेलेलो नाही. सध्या आपण गप्प आहोत, असे बुधवारी एका कार्यक्रमात सांगितले.

सतत मीडियासमोर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर होते. राज ठाकरे बोलले म्हणजे मीडियालाही विषय मिळतात, त्यामुळे बुधवारी तरी ते काही राजकीय भाष्य करतात का, याकडे सर्व पत्रकारांचे डोळे लागले होते.

दस-याच्या मुहूर्तावर मनसेच्या सहकारी बँक नवनिर्माण कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी मुद्दामच मीडियासमोर आलो नाही. मला जे काही सांगायचे होते ते मी अगोदरच सांगितलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मी जास्त काही बोलत नाही. मात्र, डिसेंबरनंतर म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातील आपण फटाके फोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published: Friday, October 26, 2012, 09:30


comments powered by Disqus