राज ठाकरे मातोश्रीवर, पुन्हा एकदा बाळासाहेबांची घेतली भेट, Raj Thackeray in Matoshree

राज ठाकरे मातोश्रीवर, बाळासाहेबांची घेतली भेट

राज ठाकरे मातोश्रीवर, बाळासाहेबांची घेतली भेट
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी दुपारी मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांची भेट घेण्यासाठी राज आले होते, असे सुत्रांकडून कळते आहे. गेले दोन ते तीन दिवस राज ठाकरे सतत मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेत आहेत.

८६ वर्षीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेले काही दिवस अत्यावस्थ असल्याचे समजते आहे. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत असल्याने साऱ्यांनाच चिंता वाटत आहे. शिवाजी पार्कवर आयोजित दसरा मेळाव्यालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते.

व्हिडिओ रेकॉर्डिंगमार्फत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. नंतरच्या काळात ‘मातोश्री’वरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. यादरम्यान माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

First Published: Wednesday, November 14, 2012, 16:44


comments powered by Disqus