Last Updated: Friday, November 9, 2012, 18:44
www.24taas.com, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महालिकेतील मनसे कार्यालयाचं आज उदघाटन केलं. मनसेच हे कार्यालय अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असणार आहे.
पालिकेत मनसेचे २९ नगरसेवक आहेत, त्यांना बसण्यासाठी मोठं कार्यालय नव्हतं, त्यामुळे नगरसेवकांची अडचण होत होती. आता या कार्यालयामुळे नगरसेवकांची अडचण दूर होणार असून त्यांना व्यवस्थित काम करता येणार आहे.
मनसे आता मुंबई महापालिकेत आपला वचक कसा ठेवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मनसेची भुमिका काय असणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
First Published: Friday, November 9, 2012, 18:00