वाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय raj Thackeray is not celebrating his birthday

वाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

वाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम साजरे करू नका, तसंच वाढदिवसाचा होर्डींग्जही लावू नका, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

तसेच मुंडेंच्या गाडीला झालेला अपघात हा घातपात वाटत नसल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनी यावेळी स्वतः निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.

तसेच जनतेनं पाठींबा दिला तर मुख्यमंत्री होण्यासही ते तयार आहेत. यामुळे आता या निवडणुकांना मनसेच्या दृष्टीने चांगलंच महत्त्व आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 22:04


comments powered by Disqus