Last Updated: Thursday, November 15, 2012, 09:15
www.24taas.com, मुंबईराज ठाकरे मातोश्रीवरुन थोड्याच वेळापूर्वी निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. आज सकाळपासून शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी वाढते आहे.
काल रात्रीपासूनच शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमत आहेत. आजही हा ओघ सुरूच आहे. सध्या शिवसेनेचे सगळे मोठे नेते मातोश्रीवर आहेत.
राज ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते. सकाळीच अभिनेते नाना पाटेकरही मातोश्रीवर पोहोचलेत. मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्तात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आलीय. रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आला आहे.
First Published: Thursday, November 15, 2012, 08:57