Last Updated: Saturday, November 10, 2012, 16:43
www.24taas.com, मुंबईमनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सलग दुस-या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी शुक्रवारी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मागच्या आठवड्यातही त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांचे वजन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करीत आहे. त्यामुळेच शुक्रवारी भेट घेतल्यानंतरही राज यांनी शनिवारी दुपारी भेट घेतली.
First Published: Saturday, November 10, 2012, 16:31