...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज , Raj Thackeray on bihar police

...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज

...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज
www.24taas.com, मुंबई

बिहारमध्ये गुन्हेगारांना पकडण्यात गैर काय, असा सवाल करत बिहारच्या मुख्य सचिवांना राज ठाकरेंनी इशारा दिला आहे. तर आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, याचा पुनरुच्चार राज यांनी केला.

अमर जवान स्मारक तोडणारा बिहारीच होता, हे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांना करण्यात येत असलेल्या मज्जावाबाबत निषेध व्यक्त केला आहे. `देश एकसंध राहावा, एकत्र राहावा हे डोस मला पाजतात.` आमचे पोलीस तिथे जातात तेव्हा कारवाईची भाषा करतात, आता कुठे गेले तुमचे दिल्लीतील नेते. असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांची पाठराखण करीत बिहार पोलिसांवर टीकास्त्र सोडलं.

पोलिसांना रोखल्यास, राज्यातील बिहारींना हाकलून लावू, असा सज्जड दमच राज यांनी दिला आहे. आता नितीशकुमार गप्प का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

First Published: Friday, August 31, 2012, 14:31


comments powered by Disqus