Last Updated: Friday, August 31, 2012, 15:48
www.24taas.com, मुंबईसूरक्षेत्रच्या वादावरुन, आशा भोसलेंवर राज ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आशाताईंचं हे `अतिथी देवो भव आहे की पैसे देवो भव`, अशा शब्दांत त्यांनी आशाताईंवर कडकडीत टीका केली आहे.
कसाबला अतिथी देवो भव म्हणणार का, असा सवालही त्यांनी आशाताईंना केला आहे. सावरकर भक्त म्हणवता, तर सावरकरांना हे आवडलं असतं का,
असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सूरक्षेत्रमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग नको, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
First Published: Friday, August 31, 2012, 15:39