राज ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करणार, Raj Thackeray on Maharashtra Tour

राज ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करणार

राज ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करणार
www.24taas.com, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा प्रदीर्घ दौरा करणार आहेत. राज ठाकरे हे कोल्हापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन राज ठाकरे आपला दौरा सुरू करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज यांचा झंझावात मनसैनिकांना अनुभवता येणार आहे.

राज्यातील त्यांचा हा दौरा प्रदीर्घ असून कोल्हापुरातून सुरू होऊन कोल्हापूरमध्येच पहिली सभा घेणार आहेत. ५ फेब्रुवारी ते ९ मार्च असा दौऱ्याचा कालावधी असणार आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा फेब्रुवारी ते मार्च असा तब्बल एक महिन्याचा असणार आहे.

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई, नाशिक, पुणे दौर्‍यानंतर ते मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी मनसेचे आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस राज्याच्या विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या दौर्‍यात स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

First Published: Thursday, January 10, 2013, 16:32


comments powered by Disqus