राज ठाकरे लीलावतीतून मातोश्रीवर, Raj Thackeray on Matosri

राज ठाकरे लीलावतीतून मातोश्रीवर

राज ठाकरे लीलावतीतून मातोश्रीवर
www.24taas.com, मुंबई

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा अँजिओप्लास्टी होणार आहे. बांद्र्यातील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यासाठी उद्धव यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातून थेट लीलावतीत दाखल झाले. त्यानंतर ते आता मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेत.

उद्धव ठाकरे सकाळी साडेदहा वाजता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जुलै महिन्यातच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच शस्त्रक्रियेची पुढची पायरी म्हणून ही दुसरी अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे हे पुण्यात दौऱ्यानिमित्त असल्याने ते येणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली.

उद्धव ठाकरेंच्या हृदयामध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्यानंतर त्यांच्यावर जुलै महिन्यात अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर त्यांच्या हृदयातील रक्तपुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला होता. पण अजून असलेले ब्लॉक्स दूर करण्यासाठी ही अँजिओप्लास्टी होणार आहे.

First Published: Sunday, November 4, 2012, 12:42


comments powered by Disqus