Last Updated: Thursday, January 3, 2013, 15:19
www.24taas.com, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते आणि आस्थापना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करून टाकलं आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ही सारी पदे बरखास्त करण्यात आली आहे.
मनसेची संलग्न संस्था असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते आणि आस्थापना सेना या संघटनेची सर्व पदं बरखास्त करण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. परस्पर नेमणुकीच्या वादामुळे राज यांनी हे आदेश दिले आहेत.
तसेच राज ठाकरेंनी कडक शब्दांत पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. जर कोणी जुन्या पदांचा गैरवापर केल्यास त्याच्यावर पक्षांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही भरण्यात आला आहे. तसंच यापुढे अन्य संलग्न संस्थांमध्ये परस्पर नेमणुका होऊ नयेत, असे आदेशही देण्यात आलेत...
First Published: Thursday, January 3, 2013, 15:09