Last Updated: Thursday, January 9, 2014, 19:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपनं राज ठाकरेंवर जोरदार प्रतिहल्ला केलाय. मोदींचा टीआरपी वाढल्यामुळे राज यांनी या प्रकारचे आरोप केल्याची जोरदार टीका प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मोदींनी कधीही मनसेचा पाठिंबा मागितला नसल्यानं तो गृहीत धरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदींना पाठिंबा नसल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर थेट हल्ला चढवलाय. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, मोदींनी गुजरातपुरतं मर्यादित राहून चालणार नाही असं वक्तव्य करत राज ठाकरेंनी मोदींवर थेट हल्ला केलाय.
तसंच मुंबईत महागर्जना रॅली घेऊन त्यामध्ये गुजराती लोकांचे गोडवे कशासाठी गायले, असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख का केला नाही असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. तर महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 9, 2014, 18:59