Last Updated: Friday, August 10, 2012, 22:18
www.24taas.com,मुंबईतापाने आजारी असलेले राज ठाकरे दोन आठवड्यांनी घराबाहेर पडले ते आपल्या नव्या लूकसह... कधीच दाढी न ठेवणाऱ्या राज ठाकरे यांनी फ्रेंच कट दाढी ठेवली होती. ही राज यांची नवी स्टाईल त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळतीजुळती.. त्यामुळे राज यांच्या या नव्या लूकची चर्चा आता सुरू झाली आहे.
या फ्रेंच कटमुळए काका-पुतण्यातल्या साधर्म्य गुणात आणखी एक भर पडली आहे, नाही का ?..... गेल्या काही दिवसांत ठाकरे कुटुंबात निर्माण झालेल्या सुमधूर संबंधांना आणखी चालना मिळाली ती राज ठाकरेंच्या या कॉपीकॅट लूकमुळे.
छोट्याशा आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांना भेटायला बाहेर पडलेले राज ठाकरे दिसले ते या नव्या रुपात... त्यांना या रुपात बघून अनेकांना त्यांच्या काकांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही... आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राज ठाकरेंच्या नव्या फ्रेंच कटची... अर्थात, आता या स्टाईलला अंकल्स कट असं नाव दिलं तर जास्त संयुक्तिक ठरेल... आता, राज यांची ही श्रावणी स्टाईल आहे की परमनंट हे येणारा काळच ठरवेल... मात्र, राज आपली कॉपी करतात अशी टीका बाळासाहेबांनीच केली होती. आणि, राजच्या या स्टाईल स्टेटमेटनंतर बाळासाहेबांच्या म्हणण्यात तथ्य आहे, असं म्हटलं तर चुकलं तरी काय?
First Published: Friday, August 10, 2012, 22:18