ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज Raj Thackeray slams traders

ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज

ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

LBTच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या व्यापा-यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.

लोकांना वेठीला धरणं थांबवा. ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू अशा शब्दांत राज यांनी संपकरी व्यापा-यांना खडसावलंय. जे मुद्दे आहेत, ते सरकारसोबत वाटाघाटी करून सोडवा, मात्र यापुढे सामान्य जनतेला त्रास देऊ नका, असं राज ठाकरे म्हणालेत.

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कारण एलबीटीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झालेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. राज आणि उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचं झी २४ तासनं सर्वप्रथम मांडलं होतं.

First Published: Sunday, May 12, 2013, 19:17


comments powered by Disqus