Last Updated: Wednesday, January 29, 2014, 13:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे. या शक्यतेला राज ठाकरे मात्र आपल्या अंदाजात उडवून लावलंय. `मला अटक कराच` असं आव्हानचं एकप्रकारे राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलंय.
पुण्यातल्या राजगड आणि लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. २६ जानेवारीला नवी मुंबईत राज ठाकरेंनी टोलविरोधात वक्तव्य करताना जनतेला टोल न भरण्याचं आवाहन केलं होतं.
मनसेच्या टोलविरोधी तोडफोड आंदोलनानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली असून आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलीय.
याचबद्दल बोलताना, `सरकारला काय करायचे ते करू दे, मला काय करायचे ते मी करणारच` अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलीय.
मनसेच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या राज ठाकरेंनी शुक्रवारी पुणे दौरा आयोजित केलाय. यावेळी त्यांना अटक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 29, 2014, 13:36