Last Updated: Friday, June 6, 2014, 19:33
www.24taas.com, झी मराठी, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत.
कल्याणमध्ये 2008 साली रेल्वे नोकरभरती परीक्षा असतांना, परप्रांतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी राज ठाकरे उद्या कोर्टात हजर राहणार आहेत.
राज ठाकरे याआधी सुनावणीसाठी अनेकदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आलं होतं.
आता वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी राज यांना व्यक्तीश: हजर रहावं लागणार आहे.
रेल्वे भरतीवेळी परप्रांतीय विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीत राज्यात 85 हून अधिक ठिकाणी खटले दाखल झाले होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 6, 2014, 14:36