राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर..., raj thakeray at matoshree

राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर...

राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर...
www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याचं सांगण्यात येतंय.

या अगोदर जवळपास दोन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या गाडीचे सारथी बनून मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं होतं. आता सध्या बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असताना राज ठाकरेंनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा ‘मातोश्री’मध्ये पाऊल टाकलं.

‘ज्या माणसानं मला अंगाखांद्यावर खेळलो... ज्यांनी वाढवलं... ज्यांनी संस्कार केले... कसं वाटणार त्यांना भेटून...? नक्कीच खूप आनंद झाला होता.’अशी भावना बाळासाहेबांच्या मागच्या भेटीत राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. यावेळी बाळासाहेबांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणतात, याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय. ही भेट नेमकी कशासाठी होती, या भेटीच्या वेळी काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. मात्र, काका-पुतण्यांमधला विसंवाद संपल्याचीच ही चिन्हं आहेत.

First Published: Monday, October 1, 2012, 14:24


comments powered by Disqus