Last Updated: Thursday, December 19, 2013, 15:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे पेंटिंग्ज आणि व्यंगचित्रांचं मुंबईत प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली.
आर. के. लक्ष्मण यांच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक दुर्मिळ अशी व्यंगचित्र या प्रदर्शनामध्ये आहेत. हे प्रदर्शन नेहरु सेंटर इथं मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. १३ डिसेंबरला सुरू झालेलं हे प्रदर्शन येत्या ५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी आर. के. लक्ष्मण यांची भेट घेतली. सर्व व्यंगचित्र पाहून कदाचित राज ठाकरेंना बाळासाहेबांची नक्कीच आठवण आली असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, December 19, 2013, 14:41