एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंचा एल्गार!Raj Thakre write a letter for ST drivers

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंचा एल्गार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंचा एल्गार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारलाय. साडेसतरा टक्के प्रवासी कर रद्द करावा अशी मागणी करणारं पत्र राज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय.

एसटी कामगार कमी वेतनश्रेणीत काम करत आहेत. त्यांची वेतनश्रेणी सुधारावी यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी यात करण्यात आलीय. एसटी कामगारांच्या मागण्यांकडे सरकारनं वेळीच लक्ष दिलं नाही तर कामगारांच्या संतापाचा उद्रेक राज्यभर होईल असा इशाराही राज यांनी पत्रातून दिलाय.

मुख्यमंत्र्यांनीही राज यांच्या या पत्राची गांभीर्यानं दखल घेतल्याचं मनसे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, December 5, 2013, 14:36


comments powered by Disqus