राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री, Raj trying to score over Sena`s hindutva-CM

राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री

राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री

www.24taas.com, मुंबई

‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.

‘इतके दिवस मनसेचं लक्ष उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्यांकडून मत मिळवण्याचा एक प्रयत्न होतं. पण, पहिल्यांदाच मनसे एका मोठ्या मुद्दयावर भूमिका घेतली आहे. मनसे आपल्याकडील मुस्लिम उमेदवारांमुळे बऱ्याच ठिकाणी जिंकली होती. मनसे मुस्लिम-विरोधी पक्ष कधीच नव्हता. मात्र शिवसेनेने अमर जवान स्मारकाला श्रद्धांजली वाहिल्यावर सेनेची कमजोर बाजू आपल्या फायद्याची करण्यासाठीच मनसे ने हा मोर्चा आयोजित केला आहे’, असं काँग्रेसचे एक मोठे आमदार म्हणाले.


आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला काय जाब विचारणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. गिरगांव चौपाटीवर कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला आहे. याआधीच राज यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज आज सरकारवर काय तोफ डागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

मनसेच्या मोर्चाला सरकारची परवानगी नसली तरी मोर्चा निघाला आहे. या मोर्चाचा मार्ग-मरीनड्राईव्ह- मत्सालय,इस्लाम जिमखान्याला डावा वळसा घालून फडके चौक- बीएमसी ऑफिसमार्गे आझाद मैदान असा असेल. आझाद मैदानात संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा होईल.

First Published: Tuesday, August 21, 2012, 15:50


comments powered by Disqus