Last Updated: Saturday, February 15, 2014, 22:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अखेर राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. राज्य सरकारने शनिवारी रात्री उशिरा मारिया यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मारिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तब्बल १५ दिवसांनंतर मुंबईला मारियांच्या रूपानं नवा पोलीस आयुक्त मिळाला आहे.
मारिया हे १९८१ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्र एसटीचे प्रमुख म्हणून ते काम करत होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक दहशतवादी कारवायांचा तपास मारिया यांनी केला आहे. दहशतवादी संघटनांचे कर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे.
दरम्यान, १९८० च्या बॅचचे अधिकारी असलेल्या विजय कांबळे यांची ज्येष्ठता डावलून मारिया यांच्या गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडल्यानं कांबळे हे नाराज असल्याचं समजतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 22:20