Last Updated: Friday, March 29, 2013, 10:46
www.24taas.com, मुंबईमनसेचे आमदार राम कदम हे पुन्हा अडचणीत आले आहेत. मुंबईतल्या पंतनगरमधल्या रेशन दुकान मालकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय.
राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राम कदम यांना निर्णयाला आव्हान देण्यासाठी सहा एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळं कदम यांना हायकोर्टात धाव घ्य़ावी लागणार आहे. त्यामुळं त्यांचं भवितव्य़ हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार राम कदम यांना न्यायालयीन कोठडीचा पाहुणचार घ्यावा लागला होता. आता या प्रकरणामुळे पुन्हा राम कदम यांना कोर्टासमोर हजर राहावं लागणार आहे.
First Published: Friday, March 29, 2013, 00:04