राम कदम नारायण राणेंच्या भेटीला! Ram kadam meets Narayan Rane

राम कदम नारायण राणेंच्या भेटीला!

राम कदम  नारायण राणेंच्या भेटीला!
www.24taas.com, मुंबई

मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वांद्रे इथल्या मना-स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशींना विधानभवनात आमदारांकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी राम कदम यांना निलंबीत करण्यात आलंय. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राम कदम मनसेमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे या भेटीचं गूढ अधिक वाढलंय.


याच महिन्यात झालेल्या मनसेच्या वर्धापनदिनाला कदम गैरहजर राहिले होते. त्यानंतर पीएसआय मारहाण प्रकरणी त्यांच्यासकट दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी स्वतः राज ठाकरेंनी केली आहे.

First Published: Sunday, March 31, 2013, 20:13


comments powered by Disqus