Last Updated: Wednesday, May 1, 2013, 22:07
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईशिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी स्वकियांवर हल्लाबोल केलाय. मी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेत जाणार असा अपप्रचार केला जातोय, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. शिवसेनेचे काँग्रेस झालेय, असेही ते म्हणालेत.
मला संपविण्यासाठी विडा उचलला जात आहे. त्यासाठी मी शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेमध्ये जाणार आहे, असा सध्या प्रचार सुरू आहे. कदाचित हा अपप्रचार स्वकियांकडूनच केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
वेळ आल्यास आपण गाडीखाली जीव देऊ. मात्र, शिवसेनेशी कदापी गद्दारी करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच यावेळी त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होतेय की काय? असा सवालही उपस्थित केलाय. त्यामुळे रामदास कदम यांना हा सवाल अडचणीत आणू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
First Published: Wednesday, May 1, 2013, 22:04