आठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?, Ramdas Athawale happy about shiv sena

आठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?

आठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवाळी गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय. आपल्या राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आठवलेंनी या भेटीनंतर दिली.

दरम्यान मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. हे दोघंही भेट घेण्यासाठी नाही तर भेट देण्यासाठी आल्याचं आठवलेंनी सांगितलं.

तसंच रिपाइंने दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरील आपला आग्रह सोडल्याचे संकेतही आठवलेंनी यावेळी दिले आहेत.

दरम्यान, दसरा मेळाव्यातून जोशींना अपमानित होऊन स्टेजवरून उतरावं लागलं होतं. त्या प्रकारानंतर आज मनोहर जोशी प्रथमच ‘मातोश्री’वर गेले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक गोष्टींवर बोलायचं होतं मात्र भेटायला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गर्दीमुळं बोलता आलं नाही, असं मनोहर जोशींनी यावेळी सांगितलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 22:33


comments powered by Disqus