Last Updated: Tuesday, November 19, 2013, 17:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफेसबुकमुळे आपल्याला नवे-जुने मित्र भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारता येते. आपल्या आठवणींना उजाळा मिळतो. तंत्रज्ञान हे तारक असते तसे ते मारकही असते. मुंबईच्या फॅशन डिझायनर तरुणीला फेसबुकवरील मैत्री फारच महागात पडली.
फेसबुकवर एका अनोखळी व्यक्तीशी झाली. जे अपेक्षित नव्हते तेच झाले. पहिले प्रेम झाले, मग सेक्स आणि मग धोका.... मुंबईत माहिम परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय फॅशन डिझायनर असलेल्या नेहा (नाव बदलले आहे)ला ठाण्यातील वाघबीळ येथे वसंत लीला कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या निखील ऊर्फ सुदर्शन उदाबा (२८) याने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नेहाने निखीलची रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे चॅट, गप्पा यातून चांगली ऑनलाईन ओळख झाली. यातूनच मोबाईल संभाषण, मैत्री, ब्लाइंड डेटिंग आणि शेवटी यांचे रूपांतर प्रेमात झाले.
नेहा आणि निखील यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. याच काळात निखीलने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्या दरम्यान, निखीलने नेहाला ठाणे आणि वाशी परिसरातील लॉजवर वेळोवेळी नेले आणि बलात्कार केला. मात्र, काही दिवसांनी निखील नेहाला टाळू लागला. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच नेहाने निखीलविरूद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी निखीलविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि नंतर अटक केली. निखीलला काल कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 17:12