Last Updated: Wednesday, October 9, 2013, 15:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगेल्या आठवड्यात मुंबईतील सांताक्रुझ येथे दोघांनी बलात्कार केल्याचा दावा एका ५८ वर्षीय महिलेने केला होता. मात्र, तिच्यावर बलात्कार झालेच नसल्याचे पुढे आले आहे. दोघांनी आपल्याला दारू पाजून बलात्कार केल्याचे या महिने तक्रारीत म्हटले होते.
दिंडोशी येथे राहणारी ही महिला २ ऑक्टोबर रात्री ८.३० वाजता माहिम चर्चमध्ये जाऊन येते असे मुलीला सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री कपडे विस्कटलेल्या स्थितीत ती महिला घरी पोहोचली. दारू प्यायल्याचे घरी कळू नये म्हणून या महिलेना नाट्य रचले.
ढोसलेल्या महिलेने दोघांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे मुलीला सांगितले. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा मुंबईत बलात्कार असे वृत्त पसरले आणि खळबळ उडाली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. या महिलेवर बी समरी प्रॉसुक्युशन दाखल करणार असल्याचे पोलीस उपायुक्त बी. शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 15:28