Last Updated: Sunday, February 23, 2014, 15:45
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईऐरोलीच्या सेक्टर ३ परिसरात एका ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय.
ही महिला आपल्या मुलाला शोधण्यासाठी बाहेर निघाली असता हा प्रकार घडलाय. २ फेब्रुवारीला हा प्रकार घडलाय.
या महिलेचा मुलगा घरी आला नाही, त्यामुळे ती त्याला शोधायला बाहेर पडली. यावेळी तिच्या ओळखीच्या जोन नाडर या व्यक्तीने तिला आपल्या गॅरेजजवळ बोलावलं.
तिथे तिला मदतीची भूलथाप देण्यात आली. मात्र ही महिला गॅरेजपाशी पोहोचली, तेव्हा जोनसह रजनीश तिवारी आणि मोजेक साल्वी यांनी तिच्यावर बलात्कार केला.
या तिघांनाही अटक झाली असून आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 15:45