मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार... पाजलं फिनाईल!, rape on girl in ray road, mumbai

मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार... पाजलं फिनाईल!

मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार... पाजलं फिनाईल!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नवीन वर्षाच्या प्रारंभाला अवघे काही तास उरले असताना मुंबईत ‘न्यू इअर सेलिब्रेशन’ला गालबोट लागलंय. मुंबईतील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.

मुंबईतील रे रोड दारुखाना भागात ही धक्कादायक घटना घडलीय. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षांची आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपीविरुद्ध याअगोदरही पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत छेडछाडीची तक्रार नोंदवली होती. परंतु, त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

संबंधित आरोपीनं १७ वर्षीय मुलीला अमानुष मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्यासाठी त्यानं तिला फिनाईलही पाजलं... आणि यानंतर एका मित्राच्या घरातील बेडमध्ये तिला लपवून ठेवलं... परंतु, ही मुलगी थोडक्यात बचावली. तिच्या नातेवाईकांनी तिला शोधून काढून हॉस्पीटलमध्ये दाखल केलं... अशी माहिती पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलीय. या मुलीवर सध्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचं मुलीच्या नातेवाईकांनी आरोप केलाय. बलात्काराच्या घटनेला १५ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जातेय. सोमवारी रात्री नातेवाईकांनी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली.... त्यानंतर आज सकाळी मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीदेखील पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस येऊन केवळ विचारपूस करून निघून गेले... मात्र, कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 14:00


comments powered by Disqus