नोकरीसाठी मुंबईत आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कारRape on Minor girl in Mumbai who came for job in c

नोकरीसाठी मुंबईत आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

नोकरीसाठी मुंबईत आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नोकरीच्या शोधात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर माहीम परिसरात बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी माहीम पोलिसांनी मुलीच्या एका महिला नातेवाईकासह बलात्कार करणार्याआ आरोपीला अटक केली आहे.

दीड महिन्यापूर्वी पीडित १४वर्षीय मुलीला तिच्या चुलत मावशीनं नोकरीसाठी मुंबईत आणलं होतं. माहीम पोलीस ठाण्यालगत असलेल्या झोपडपट्टीत राहणारी तिची मावशी कामानिमित्त दिवसभर बाहेर राहत होती. याच परिसरात राहणारा शेअरअली सिद्दीकी(४0) हा या महिलेच्या घरी येत असे.

मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधत त्यानं तिला धमकी देऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. मात्र, धमक्यांमुळं पीडित मुलीनं ही बाब कोणालाही सांगितली नव्हती.

दरम्यान, दिवसेंदिवस आरोपीचा अत्याचार वाढत चालल्यानं या मुलीनं ही बाब मावशीच्या कानावर घातली. मात्र, मावशीनंही तिच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करून या ठिकाणी राहायचं असेल तर हे सहन करावं लागेल, असं धमकावलं. अखेर, दोन दिवसांपूर्वी तिनं शेजारी राहणार्या एका महिलेला ही बाब सांगितली. त्यानुसार या महिलेनं मुलीला घेऊन माहीम पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 17:08


comments powered by Disqus