Last Updated: Friday, June 6, 2014, 17:17
www.24taas.com, झी मराठी, मुंबईमुंबईत एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे.
नोकरीचं कारण सांगून ट्रॉम्बेमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह 4 जणांना अटक केलीय.
पीडित तरुणीने ब्युटिशियनचा कोर्स केला होता. शेजारीच राहणाऱ्या नसीम बानू या महिलेने पीडीत महिलेला नोकरी मिळवून देण्याचं आमीष दाखवलं.
यानंतर आरोपी महिलेने तिला ४ जून रोजी कुर्ल्याला नेलं. तरुणीला आमीर नावाच्या व्यक्तीच्या स्वाधीन करुन महिला तिथून निघून गेली.
यावेळी आमीरने आपल्या दोन साथीदारांना कुर्ल्याला बोलावून घेतलं. साथीदारांच्या मदतीने तिला चेंबूरमधील घरी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
आपल्या घरी पोहोचल्यानंतर पीडित तरुणीने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 6, 2014, 17:17