Last Updated: Tuesday, April 30, 2013, 14:59
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे ठाण्यात वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून सात महिन्यांची गरोदर आहे.
भावाचे वय १९ असून मे २०१२ पासून त्याने वारंवार बहिणीवर बलात्कार केला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ही १४ वर्षीय मुलगी गरोदर आहे, पोलीस तपासात भावानेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर या प्रकरणात पोलीसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. या मुलांचे आई-वडील मोलमजुरी करतात.
दिवसेंदिवस राज्यात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे मात्र ठाण्यात चांगलीच खळबळ माजली आहे.
First Published: Tuesday, April 30, 2013, 14:59