लालदिव्याचा वापर आणि सायरन कोण वाजवणार?, Redlight Rules

लालदिव्याचा सायरन कोण वाजवणार?

लालदिव्याचा सायरन कोण वाजवणार?
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

लालदिवा आणि त्याचा सायरन कोणी वाजवायचा याची एक यादीच राज्य वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलंय. तसंच या संदर्भातल्या दंडाची रक्कम ५० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केंद्राला करण्यात आलीय.

फ्लँशिंग रेड लाईट्सच्या आधीच्या यादीत ४० टक्क्यांची कपात करण्यात आलीय. फ्लँशिंग लाईट्स यापुढे फक्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले सदस्य, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती, विधानसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, आणि विरोधीपक्ष नेता यांनाच वापरण्याची परवानगी आहे.

फ्लॅशरशिवाय रेड लाईट वापरण्याचा अधिकार हायकोर्ट जजेस, विधानपरिषदेचे उपसभापती, विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्य निवडणूक आयुक्त, मुंबई पालिका आयुक्त, पोलीस महासंचालक यांनाच वापरण्याची परवानगी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 12:56


comments powered by Disqus