Last Updated: Wednesday, March 19, 2014, 20:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून वगळा, असं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलं आहे.
डॉ.विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांना भाजपकडून नंदुरबारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
हीना गावित यांनी भाजपची उमेदवारी केली तर डॉ.विजयकुमार गावित यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करू असा इशारा अजित पवारांनी काल दिला होता.
आज हीना गावित यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी डॉ.गावित यांना मंत्रिमंडळातून हटवा, असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.
डॉ. हीना गावित या काँग्रेसचे सर्वात जास्त काळ खासदार असणाऱ्या माणिकराव गावित यांच्याविरोधात नंदुरबारमधून निवडणूक लढवणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 19, 2014, 20:53