Last Updated: Thursday, January 23, 2014, 22:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकाळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे.
नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल.
आरबीआय बँकांच्या माध्यमातून लोकांच्या सहयोगाने, वर्ष २००५ पूर्वी छपाई झालेल्या ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे.
घाबरून जाऊ नका, सहकार्य करा - आरबीआयलोकांनी घाबरून जाऊ नये, या नोटा बदलण्यात संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन आरबीआयने देशातील जनतेला केलं आहे.
२००५ आधीच्या नोटांना ओळखणं सहज सोप आहे. कारण, या नोटांवर छपाईचं वर्ष छापलेलं नाही.
तर २००५ नंतर जारी केलेल्या नोटांवर मागील बाजूस खाली वर्ष दिलं आहे. ज्या नोटांवर तारीख नाही, त्या नोटा बँक १ एप्रिल २०१४ नंतर परत घेणार आहे.
जुन्या नोटाही चलनात राहतील, पण२००५ आधी छापण्यात आलेल्या नोटा १ एप्रिल २०१४ नंतरही चलनात राहतील. तसेच २००५ आधी तयार झालेल्या नोटांना कोणत्याही बँकेत जाऊन बदलता येणार आहे.
बँकच्या निदर्शनास आलेल्या आणि लोकांनी स्वत:हून आणून दिलेल्या २००५ पूर्वीच्या नोटा बँक आपल्याकडे जमा करणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
या नोटा बदलून घेण्यामागे आरबीआयने कोणतंही कारण सांगितलेलं नाही, मात्र काळा पैसा जो कॅशच्या स्वरूपात आहे, तो काळा पैसा उघड करण्यासाठी आरबीआयने टाकलेलं हे पाऊल असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाच रूपयांच्या नोटांची पुन्हा छपाई सुरूसध्या 5, 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
आरबीआयने या आधी पाच रूपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. मात्र मागणी वाढल्याने पुन्हा पाच रूपयांच्या नोटांची छपाई सुरू करण्यात आली आहे.
आरबीआयने बँकेच्या स्तरावर काही सिरीजच्या नोटा परत घेतल्या होत्या. मात्र लोकांनी या नोटा आणून द्याव्यात असं आवाहन त्यात नव्हतं, थोडक्यात लोकसहभाग त्यात नव्हता.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१३ पर्यंत ७ हजार ३५१ कोटी नोटा चलनात होत्या. यातील १४.६ टक्के ५०० रूपयाच्या आणि ५.९ टक्के १ हजाराच्या नोटा होत्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 20:11