दहिसरमधील बंटी-बबलीकडून रिक्षा प्रवाशांची लूट, Robbery - Banty- Babil couple arrested in Dahisar

दहिसरमधील बंटी-बबलीकडून रिक्षा प्रवाशांची लूट

दहिसरमधील बंटी-बबलीकडून रिक्षा प्रवाशांची लूट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बंटी-बबली स्टाईलने चोर्‍या करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा सपाटा लावला. त्यामुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

ही बंटी-बबलीची जोडी दिवसाढवळ्य़ा प्रवाशांच्या गळ्य़ातील दागिने हिसकावत असत. या जोडीला एमएचबी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. उमा छत्री ऊर्फ गुडीया आणि उध्दव जाधव अशी या दोघांची नावे आहेत. दहिसर येथे राहणारे या दोघांनी मुंबई पोलिसांची झोप उडविली होती.

उद्धव हा रिक्षा चालवायचा आणि गुडिया त्याच रिक्षात मागे बसायची. रस्त्यावरून जाणार्‍या महिलेच्या गळ्य़ात काही दागिने दिसले की उद्धव त्या महिलेजवळ रिक्षा थांबवायचा. रिक्षा थांबताच गुडीया पापणी लवते न् लवते तेच सोनसाखळी हिसकवायची आणि दोघे पळ काढायचे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले होतेत.

काही दिवसांपूर्वी या बबली-बंटीने बोरिवलीत एका महिलेची पर्स चोरीली. या महिलेने बोरिवली पोलीसांत तक्रार नोंदवून त्यांच्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांना दिला होता. पोलीस या दोघांचा शोध घेत असताना हे दोघे आरोपी दहिसर चेकनाका येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून एपोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांची रिक्षा जप्त केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 15:19


comments powered by Disqus