Last Updated: Friday, August 16, 2013, 14:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई जोगेश्वरी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये जिवंत काडतूसं मिळाल्याची घटना घ़डलीय. सीटखाली ही काडतुसं मिळाली आहेत. याबाबतचा तपास सुरू आहे. सफाई कर्मचा-यालाही ही काडतुसं मिळाली आहेत.
लोकलमध्ये सीटखाली २२ जिवंत काडतूसं मिळाल्याने खळबळ माजली आहे. जिवंत काडतूसं रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नेमकी ही काडतूसं कोठून आली आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी लोकल जोगेश्वरी यार्डात उभी होती. या लोकलमध्ये साफसफाई सुरू असताना तेथील सफाई कामगारांना सीटखाली जिवंत काडतूसं दिसली. सफाई कामगांरानी तत्काळ ही माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे पोलिसांनी या डब्यातून तब्बल २२ जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 16, 2013, 14:05