Last Updated: Friday, June 28, 2013, 23:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत मेट्रो - 3 चा मार्ग उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय कॅबीनेट कमिटीने सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या मेट्रो-3 ला मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रो-1 नंतर मेट्रो-3 मुंबईमध्ये धावतांना बघायला मिळणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ
मार्गावरही धावणार मेट्रो
मेट्रो-3 मार्गाला केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी
मार्ग 3चा मार्ग
असणार भुयारी
केंद्र सरकारच्या मंजूरीमुळे आता मेट्रो -3चा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 50 टक्के वाटा असेल. या प्रकल्पाची किमंत सुमारे 23 हजार कोटी रुपये असून, याचं काम पुढच्या वर्षी सुरु होणार असून 2019-2020 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, अशी आशा आहे.
मुंबईत मेट्रो- 1चा पहिला मार्ग उभारतांना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन एमएमआरडीएनं मेट्रो -3 चा मार्ग भुयारी करण्याचं आधीच निश्चित केलं होतं. मेट्रो -3 प्रकल्प कागदावर केव्हाच तयार होता. जपानमधल्या बँकेनं आर्थिक सहाय्य करण्याचं मंजूरही केलं होतं.
मेट्रो -3चा मार्ग 33 किमीचा कुलाबा - वांद्रे - सीप्झ असा असेल. या मार्गावर 27 स्टेशन्स असतील. मेट्रो -3 मुळे कुलाबा, वऱळी, प्रभादेवी, सीप्झ हे भाग मेट्रो रेल्वेने जोडले जातील. यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरचा मोठा भार कमी होण्स मदत होईल आणि मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास सुखकर होईल , अशी आशा आहे. मात्र मेट्रो-1च्या कामाप्रमाणे हे काम रखडू नये, एवढीच मुंबईकरांची अपेक्षा आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 28, 2013, 23:34