Last Updated: Saturday, November 30, 2013, 08:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअंधेरीमधील सिटी मॉलच्या जवळील रॉयल प्लाझा या सात मजली इमारतीला आग लागली. या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, २५ अग्नीशामक बंबानी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
पहाटे चारच्या सुमारास रॉयल प्लाझा या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लाग. लागलेली आग पाचव्याच्या मलजल्यांवर पसरत गेली. मात्र, अग्नीशामक बंब वेळेवर पोहोचल्याने आग आटोक्यात आल्याचं अग्निशमक दलाकडून सांगण्यात आलंय.
रॉयल प्लाझामध्ये नामांकित हॉटेल्स याच इमारतीत असल्यानं मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान चायनागेट रेस्टॉरंटमधून आग पसरल्याचं बोलले जात आहे. परंतु याला अग्निशमक दलाकडून दुजोरा मिळेला नाही.
२५ बंबांच्या सहाय्याने ही आग तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 30, 2013, 08:52