‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर? rpi agitation on free way

‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर?

‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या ‘ईस्टर्न एक्सप्रेस फ्री’वेच्या नामकरणावरून सध्या वाद सुरू आहे. ‘फ्री वे’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षानं फ्रीवेवर आंदोलन केलं.

आपल्या पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी यापूर्वीच ही मागणी केली असल्याचं आरपीआयचं म्हणणं आहे. मनसेनं बाळासाहेब ठाकरेंचं नाव या फ्रीवेला देण्याची मागणी केलीय. तसं पत्र पक्षाचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. त्यामुळे आता हा नावाचा वाद पेटलाय.

दरम्यान, फ्रीवेला बाळासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीवर मनसे ठाम असल्याचं आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र मनसे या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013, 15:18


comments powered by Disqus