आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला RR Patil to give his remuneration to Drought fund

आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला

आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला
www.24taas.com, मुंबई

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय. ५७ हजार रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिलं आहे.

खरंतर कॅबिनेट बैठकीत सगळ्या मंत्र्यांचं एक महिन्याचं वेतन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर गुरुवारी सगळ्या सरकारी कर्मचा-यांनीही आपला दोन दिवसांचा पगार देण्याची तयारी दाखवली होती.
त्यानंतर आज गृहमंत्र्यांनी आपलं महिन्याचं वेतन देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि इतर मंत्र्यांना आता तरी दुष्काळग्रस्तांची आठवण येते का नाही हेच पाहायचं आहे.

First Published: Friday, February 8, 2013, 17:36


comments powered by Disqus