सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधानSachin`s daughter did tweet, Modi is going to be the next

सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान

सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.

सारा तेंडुलकर हिनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर २५ जानेवारीला एक सर्व्हे केला होता. यात सारानं राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांपैकी कोण पंतप्रधान होणार यावर लोकांना ट्वीट करायला सांगितलं होतं. यानंतर तिनं २६ जानेवारीला लिहिलं की काल घेतलेल्या सर्व्हेनुसार नरेंद्र मोदींचे चाहते अधिक आहेत. याचाच अर्थ भविष्यात भारताचे नवे पंतप्रधान मोदीच असतील.

सारा तेंडुलकरच्या या ट्वीट आणि सर्व्हेनं हे दिसतंय की ती सुद्धा मोदींची चाहती आहे आणि राहुल गांधींपेक्षा तिला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार वाटतात. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर काँग्रेसचा खासदार आहे. आता सचिनची यावर काय प्रतिक्रिया असेल, हे पाहावं लागेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 20:03


comments powered by Disqus