Last Updated: Wednesday, September 26, 2012, 11:07
www.24taas.com, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज सकाळी निधन झाले. जसलोक रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ७० होते. बाबासाहेब कुपेकरांनी यापूर्वी राज्यसभेचे सभापतीपदही भूषवले होते. गेल्या काही दिवसांपासून कुपेकर कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि ३ मुली असा परिवार आहे.
कुपेकर १९६६ सालापासून राजकारणात होते. २००४ ते २००९ त्यांनी विधानसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं. त्याआधी त्यांनी सहकार मंत्री म्हणूनही काम केले होते. कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचे आमदार होते.
२००९ साली त्यांना मंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्षपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना कुठलंही पद न मिळाल्यामुळे ते नाराज झाले होते. तेव्हा शरद पवार यांनी कुपेकरांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्य नियोजन आयोगाचं कार्यकारी अध्यक्षपद बहाल केलं होतं.
First Published: Wednesday, September 26, 2012, 11:07