स्फोटानं हादरली... भिंत कोसळली; पाच ठार, sakinaka blast, wall collapse

स्फोटानं हादरली... भिंत कोसळली; पाच ठार

स्फोटानं हादरली... भिंत कोसळली; पाच ठार
www.24taas.com, मुंबई

मुंबईत साकीनाका परिसरात भिंत चाळीवर कोसळून पाच जणांना प्राण गमवावा लागलाय.

साकिनाका परिसरात भिंत बैठ्या चाळींवर कोसळून दुर्घटना घडलीये. या अपघाताल पाच जण जागीच ठार झालेत तर तीन जण जखमी झालेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्य सापडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री दोन वाजल्याच्या सुमारास या परिसराच्या जवळच असलेल्या अॅल्युमिनिअमची फॅक्टरीमध्ये स्फोट झाला.

अपघाताची वार्ता समजताच प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एटीएसची टीमही घटनास्थळी दाखल झालीय. नेमका कशाचा स्फोट झाला याचा पोलीस तपास घेत आहेत.

First Published: Friday, March 29, 2013, 09:27


comments powered by Disqus