चौकशी एका खुनाची, आरोपी दुसऱ्याचाच!, sandya singh murder closed another murder case

चौकशी एका खुनाची, आरोपी दुसऱ्याचाच!

चौकशी एका खुनाची, आरोपी दुसऱ्याचाच!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संध्या सिंग खून प्रकरणाची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांच्या हाती भलत्याच गुन्ह्याचा सुगावा लागला आहे. अजय जाधव या इसमाने पत्नीचा खून केल्याचं पोलीस चौकशीत कबूल केलंय.

कळवा येथील अजय जाधव ऊर्फ मुस्तफा शेख याला पोलिसांनी अटक केलीय. अजय जाधव ऊर्फ मुस्तफा शेख यानं १७ डिसेंबर रोजी आपल्या १९ वर्षीय पत्नी यास्मिन हिचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर तो पोबारा करून तिथून पसार झाला. शांती मफतलाल झोपडपट्टीत राहणाऱ्या अजयची यास्मिन ही दुसरी पत्नी होती. पोलिसांसमोर अजयनं आपला गुन्हा कबूल केलाय.


काही दिवसांपूर्वी प्रकाशझोतात आलेल्या संध्या सिंग हत्या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना खबऱ्यांकडून याबाबत माहिती मिळाली होती. एका खुनाचा तपास करताना पोलिसांना दुसऱ्याच खुनाचे धागेदोरे उलगडले. बिगारीचे काम करणाऱ्या अजय जाधवला पोलिसांनी विगर या गावातून ताब्यात घेतलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013, 21:03


comments powered by Disqus