Last Updated: Thursday, October 18, 2012, 12:01
www.24taas.com, मुंबई मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदी संजय दिना पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्राद्वारे संजय दिना पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत.
मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत किरण पावसकर यांचंही नाव आघाडीवर होतं. किरण पावसकरांच्या नियुक्तीसाठी स्वतः अजित पवार आग्रही होते तसंच इतरही अनेक नाव चर्चेत होती. त्यामुळे गेली अनेक दिवस हा निर्णय प्रलंबित होता. अखेर खासदार संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे मुंबईतील एकमेव खासदार आहेत. आगामी निवडणुका पाहता राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची नियुक्ती करत मुंबईत वर्चस्व वाढवण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचंच उघड झालंय.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर संजय दिना पाटील यांच्यापुढे अनेक आव्हानं उभी ठाकलीयत. मुंबईत एकमेकांपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचं महत्त्वाचं आव्हान संजय पाटलांपुढे असणार आहे.
First Published: Thursday, October 18, 2012, 12:01