Last Updated: Monday, April 15, 2013, 16:19
www.24taas.com, मुंबईअवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. संजय दत्तने ६ महिन्यांची मुदत मागितली आहे.
सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शरणागतीसाठी कोर्टानं त्याला 3 आठवड्याची मुदत दिली होती. ही मुदत 18 एप्रिलला संपत आहे. मुदत संपण्याअगोदर संजयनं ही याचिका दाखल केली आहे. कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही याचिका निकालात काढल्यास संजय दत्तला कोर्टासमोर शरण यावं लागणार आहे.
First Published: Monday, April 15, 2013, 16:19