घाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार, sanjay ghadi and raja chaugule leave shiv sena,

घाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार

घाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत... शिवसेनेमध्ये सन्मान न मिळाल्याने नाराज असलेल्या या दोघांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

येत्या दस-याला घाडी आणि चौगुले पुन्हा मनसेमध्ये सीमोल्लंघन करणार आहेत. माजी नगरसेवक राजा चौगुले यांनी 2007 मध्ये मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र 2012 च्या मनपा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्यानं त्यांनी घाटकोपरमधून बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं होतं. तर 2009 साली विधानसभेचे तिकीट नाकारल्याने संजय घाडी यांनी आपल्या पत्नीसह शिवसेनेचा रस्ता धरला होता.

शिवसेनेत त्यांना उपनेतेपद देण्यात आलं होतं. राज ठाकरेंचे कधीकाळी विश्वासू सहकारी असलेले घाडी आणि चौगुले आता मनसेमध्ये परतणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 13:10


comments powered by Disqus