Last Updated: Friday, June 14, 2013, 22:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मीरारोडमधल्या वल्लभभाई पटेल शाळेची बस सकाळी दलदलीत अडकली होती. बस अडकली त्यावेळी बसमध्ये 30 ते 40 मुलं होती. रामदेव पार्क परिसरात रस्त्याच काम सुरूय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दलदल झालीय.
या दलदलीतच बसच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर फसले. त्यामुळं दरवाजाही बंद झाला होता. या संपूर्ण परिस्थितीमुळे मुलांमध्ये भीतीच वातावरण होतं. मात्र परिसरातल्या नागरिकांनी आपातकालीन दरवाज्यातून या मुलांना बाहेर काढलं.
सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. धक्कादायक बाब म्हणजे सर्व नियम धाब्यावर बसवून ही खासगी बस चालवली जात होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 14, 2013, 22:33